तेंदुपत्ता तोडणाऱ्या महिलावर वाघाने केला हल्ला, वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना...



गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
सिंदेवाही ब्युरो 

(फाईल फोटो)
चंद्रपूर : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगल परिसरात वाघाने तेंदू पत्ता तोडणाऱ्या महिलावर हल्ल्या केल्याने वाघाच्या हल्ल्यात  तीन महिला ठार झाल्या. मृतामध्ये मेंढा (माल) येथील शुभांगी मनोज चौधरी (३८), कांताबाई बुधा चौधरी (६०) आणि रेखा शालिक शेंडे (४८) अशी यांचा समावेश आहे . आणि  एक महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुष यासाठी जंगल परिसरात तीन दुपारी तोडण्याकरिता  जात असतात. अशातच , शनिवारी रोजी  सकाळच्या सुमारास या चार महिला देंतूपाने तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.मात्र  दरम्यान अचानक जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये   शुभांगी आणि कांताबाई चौधरी या सासू-सुना व रेखा शालिक शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वंदना विनायक गजभिये (५०) या जखमी झाल्या.


 घटनेची. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. झालेल्या घटनेचा पंचनामा केला. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी सिंदेवाही येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू आणि एक महिला गंभीर जखमी झाल्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तेंदुपाने संकलनाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने अधिक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या



 महिलांच्या परिवारात शोक कडा पसरली आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments