विश्वशांती विद्यालय भेंडाळा चे सुयश..


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
 मुनिश्वर बोरकर 
संपादक 





चामोर्शी -
नुकत्याच पार पडलेल्या SSC परीक्षेत विश्वशांती भेंडाळा चा निकाल 86.62% लागलेला असून शाळेतून प्रथम क्रमांक पार्थ लचमा शिरगावार 81.00% द्वितीय क्रमांक क्रिश शामसुंदर झोडक 76.00% तर तृतीय क्रमांक कु आकाक्षा दशरथ भुरकुडे 75.80% यांनी प्राप्त केले. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण राऊत पर्यवेक्षक श्री संतोष सुरावार ज्येष्ठ शिक्षक श्री अरुण चौधरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments