न्यूज वृत्तसेवा
मुनिश्वर बोरकर
संपादक
चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील इसमाची त्यांच्या पोटचा मुलाने ओढणीने गळा आवळून त्याचा मृत्युदेह मित्राच्या मदतीने जंगलात फेकून दिला अश्या क्रुर हत्याकांडाने चामोर्शी तालुका हादरून गेला असुन. त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आरोपी पुत्राने तो मी नव्हेच म्हणून स्वतः पोलीस स्टेशन जाऊन वडील बेपत्ता आहेत अशी रिपोर्ट दिली . शेवटी पोलिसांनी सदर प्रकरणाचा शोध लागल्या नंतर आता
माझेवर अंगलट येणार म्हणुन त्यांनी चिचडोह बॅरेज वरून वैनगंगा नदित उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असता अखेर तो वाचला परंतु पोलीसांच्या हिसक्या मुळे दि. १ मे ला त्याला जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले. मय्यत रेवनाथ लक्ष्मण कोडापे वय ५५ वर्ष रा. मार्कंडादेव हा गावातील देवस्थानाच्या यात्री निवासात मजुरी करत राहत होता. त्यांचा मुलगा आकाश रेवनाथ कोडापे वय २९ मार्कंडादेव या दोघात नेहमीच भांडत होत होते. वडीलांच्या शिविगाळ वरून व पैशाच्या वादातून आकाशच्या मनात राग खदखदत होता. तो वाद टोकाला गेला व संतापाच्या भरात मध्य रात्रौ त्याने आपल्या वडीलाचा ओढणीने गळा आवळून त्यांची हत्या केली व त्यांनी आपला मित्र लखन मडावी याला कार घेऊन बोलावले आणि दोघांनी मिळून
मृतदेह बामनपेठ जंगलात फेकुन दिला. 30 एपिल रोजी त्यांच्या वडीलांच्या मृत्युदेहाचा सुगावा लागताच. पोलीसाचे तपास सुरु असतांना आता आपले काही खरे नाही म्हणुन त्यांनी चिंचडोह बॅरेज वैनगंगा नदित नातेवाईकांना फोन करून वडील गेले आता मी जगुन काय करू मीसुद्धा आत्महत्या करतो म्हणून १ मेला नदित उडी घेतली परंतु नाते वाईकांच्या सहकार्याने त्याचा जिव वाचला अखेर आकाश आणि त्यांचा मित्र लखन यांना आष्टी पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
Post a Comment