वडधा बोरी मुख्य मार्गावर ट्ट्रॅक्टरला अपघात, ट्रॅक्टरचा इंजिन झाला पलटी, इंजिनचे चारही चाके झाले वरती..

गडचिरोली सुपरफास्ट

न्यूज वृत्तसेवा

आरमोरी ब्युरो



मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27 ,4 ,2025 रविवार रोजी अंदाजे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास वडधा ते बोरी मुख्य मार्गावर ट्रॅक्टरचा अपघात झाला यामध्ये ट्रॅक्टरचा इंजिन पलटी झाला आणि ट्रॅक्टरचा इंजिनची चारही चाके वरती झाले. अपघातामध्ये काही जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.



जखमीला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आल्याची माहिती आहे मात्र ट्रॅक्टर हा कुणाच्या मालकीचा आहे आणि



कोणत्या कामासाठी जात होता हे मात्र कळु शकले



नाही. घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी दिसून आली घटनास्थळावरील ट्रॅक्टरचा झालेल्या अपघातावरून. ट्रॅक्टर हा अति वेगामध्ये असावा किंवा ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले असावे असा अंदाज जनतेमधून वर्तवी ण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments