गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली. सावली - तथागत गौतम बुद्धानी जो आम्हाला बौद्ध धम्म दिला त्याचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थानी सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली म्हणुनच आपण आज बौद्ध बनलो. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे यांनी केले. पंचशील बौद्ध समाज व्याहाड खुर्द येथील विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना भन्ते सुचित बोधी चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोस्तव कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड विनय बांबोळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोलीचे प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , साहित्यिक प्रा. अपेक्षा पिंपळे चंद्रपूर , रमेश डोंगरे , एन.डी. पिंपळे चंद्रपूर , तंटामुक्तीचे अध्यक्ष कवटे , मंडळाचे अध्यक्ष राजु बांबोळे , देवाजी गोंगले ' मारोती रायपूरे , विनायक बांबोळे , कविता उराडे , पृथ्वीराज डोंगरे , जर्नाधन रामटेके , रायपूरे , खोब्रागडे आदि
लाभले होते. याप्रसंगी प्रा. अपेक्षा पिंपळे म्हणाल्या की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरी क्रांती शिक्षण आणि धम्माची केली म्हणून आज आपण ताट मानेने जगत आहोत. प्रा. बोरकर म्हणाले की इतर पक्षातील खासदार - आमदारांना दुर ठेवून आंबेडकरी चळवळीतील पाहुण्यांना बोलावून कार्यक्रम थाटामाटात साजरा केला आणि बौद्ध धम्माचा प्रचारच केला. याप्रसंगी गोपाल रायपुरे , एन.डी. पिपंळे , रमेश डोंगरे यांचे समायोचित भाषणे झालीत रात्रौ गायक विजय शेंन्डे यांच्या भिम गिताचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment