गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
7822082216
गडचिरोली
२० मार्च २०२५ रोजी, विधानसभेत ६७-आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत माननीय आमदार रामदाजी मसराम यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांचा विधानसभेत पाढा वाचून विधानसभेचे लक्ष वेधले यामध्ये प्रामुख्याने विद्युतभार रानटी हत्तीने शेतकऱ्यांची केलेले नुकसान, राशन कार्ड धारकांना नियमित न मिळणारा राशन पुरवठा, गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारी ,शेतकऱ्यांच्या धानाला मिळणारे बोनस व जिल्ह्यातील रस्त्याची झालेली दुरावस्था शेतकऱ्याांच्या कृषी पंपना नियमित न होणारा विद्युत पुरवठा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपुरी असलेले सिंचनाची सोय रानटी हत्तीने शेतकऱ्यांच्या पिकांचे केलेले नुकसानि करिता भरीव नुकसान भरपाई जिल्हा परिषद शाळेमध्ये अपुरे असणारे शिक्षक शिक्षकांची कमतरता आधी विकासात्मक प्रश्नांचा विधानसभेत पाढा वाजून विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले आणि सरकारकडून त्वरित पावले उचलण्याची मागणी केली.
आमदार रामदासजी मसराम यांनी विशेषतः आरमोरीतील पायाभूत सुविधा,संबंधित समस्यांवर भर दिला. आमदार रामदासजी मसराम यांनी सरकारकडून या क्षेत्रांमध्ये अधिक निधी आणि संसाधने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. आमदार रामदासजी मसराम विधानसभेत विकासात्मक प्रश्नावर चर्चा करून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता विनंती केल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्र तथा गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने मनात समाधान व्यक्त होत आहे.
Post a Comment