पतीने पत्नीवर वासल्याने केला वार पत्नी गंभीर जखमी , अन् स्वतःलाही भोकसले.. आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील घटना...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
आरमोरी/गडचिरोली 



मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे दिनांक 27 -2 -2025 गुरुवार रोजी रात्रीचे अंदाजे 12 वाजे



 सुमारास पतीने पत्नीवर वासल्याने वार केला यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली .तर पतीने स्वतःलाही चाकुने भोकसल्याने पती सुद्धा गंभीर जखमी झाला . दोघेही पती पत्नी गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलवल्याची अंदाजे



 माहिती मिळाली आहे. पत्नीवर वार केलेल्या पतीचे ताराचंद येळमे अंदाजे वय 55 असे नाव आहे.. सदर घटनेची माहिती कोजबी येथील पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस विभाग यांनी लागलीच घटनास्थळावर दाखल होऊन



 घटनेच्या पंचनामा सुरू केला आहे. मात्र पतीने पत्नीवर हा एवढा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणाने केला हे मात्र अद्याप कळु शकले नाही.

0/Post a Comment/Comments