गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दि.२४-१०-२०२४
गडचिरोली
रानटी टस्कर हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका काम करणाऱ्या मजुराच्या जिवावरच चांगलाच बेतला आहे.. जंगली टस्कर हत्तीने मजुरावर हल्ला करून त्याला चिरडून जागीच ठार केल्याची . घटना चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगल परिसरात गुरुवारी (दि. २४) सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. श्रीकांत रामचंद्र सतरे (२३, रा. नवेगाव, भुजला, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे जंगली हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम सुरू आहे .आणि केबल टाकण्याचे काम करण्याकरिता मुल तालुक्यातील नवेगाव येथून श्रीकांत सतरे हे आपल्या काही सहकर्यासोबत केबल टाकण्याचे काम करण्या करिता आले होते. मात्र गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू होते. दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात आपले बस्तान मांडले होते अश्यातच. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात टस्कर हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली असता केबल टाकणाऱ्या मजुरांपैकी तिघेजण हत्ती पाहण्याकरिता गेले होते
श्रीकांत याला हत्तीसोबत सेल्पी काढण्याचा मोह आला आणि हत्तीसोबत सेल्फी
काढण्यात मग्न असतानाच हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले. तोपर्यंत श्रीकांत सोबत असलेले दोन सहकारी यांनी तेथून पळ काढत आपला जीव वाचविला. हे मजूर केबल टाकण्याचे काम करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते. अशी माहिती मिळाली आहे.
Post a Comment