मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावर रस्त्याच्या मधोमध उभी राहून मुख्य मार्गाने येणाऱ्या वाहनांना दुचाकी धारकांना थांबविण्याकरिता हात वारे करणारी "ती" युवती कोण? पोलीस प्रशासनाने "त्या, युवतीचा लावावा छडा, ती युवती मदत मागणारी की...! लुटारू... मुख्य मार्गाने रात्रीच्या सुमारास प्रवास करणारे वाहनधारक दुचाकी वाहनधारक भयभीत अवस्थेत..





गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 
देसाईगंज
ते कोंडाळा मुख्य मार्गावर गेल्या काही दिवसापासून मध्यरात्रीच्या सुमारास एक युवती मुख्यमार्गाच्या मधोमध उभी राहून मुख्य मार्गाने येणाऱ्या चार चाकी वाहनधारक व दुचाकी धारक यांना थांबविण्याकरिता हातवारे करताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे .यामध्ये ती युवती मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांना थांबवीत असल्याचे दिसते आहे .मात्र ही युवती मुख्य मार्गाने येणाऱ्या वाहनधारकांना मदत मागते की त्यांना लुटण्याच्या इराद्याने थांबविते आहे असा प्रश्न कोंढाळा ते देसाईगंज मार्गाने प्रवास करणाऱ्या चार चाकी दुचाकी वाहन धारकांना पडत आहे. या युवती सोबत काही लुटारू गॅंग तर नाही ना असे सुद्धा प्रवास धारकांमध्ये बोलले जात आहे
.पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या युवतीच्या व्हिडिओची दखल घेऊन या युवतीचा शोध लावावा असे प्रवासधारकांमध्ये बोलले जात आहे .
मात्र . या युवतीमुळे कोंढाळा ते देसाईगंज मुख्य मार्गाने प्रवास करणारे दुचाकी चार चाकी प्रवासधारक भयभीत असल्याचे दिसते आहे.

0/Post a Comment/Comments