गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
मुंबईः गोरेगाव पश्चिम भागातील टोपीवाला सोसायटीमध्ये सकाळी पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले होते. किशोर पेडणेकर यांनी पत्नी डॉ. राजश्री पेडणेकर यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर इंमारतीवरून उडी घेत आत्महत्या
केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्या- हत्या प्रकरणामागील नेमका हेतू काय होता, हे जाणून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दक्षि धक्कादायक म्हणजे आपल्या मृत्यूची माहिती समजल्यावर मुलाला मोठा धक्का बसेल, त्यामुळे त्याची गडबड उडू नये, याची तजवीज आधीच किशोर पेडणेकर यांनी करून ठेवल्याचे समोर आले.
Post a Comment