गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली
आरमोरी - तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाळी उत्पादनात घठ आल्याने नदि नाल्यांवर पंप बसवून व काही शेतकरी विहीवर तसेच ईटिया डोह प्रकल्पाच्या पाण्यानी उन्हाळी धान पिक मोठ्या घेतले परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी घरी जागा नसल्यामुळे रस्तेवर झाकुन ठेवले काहीचे पावसाच्या पाण्यानी भिजलेही यात शेतकऱ्यांची नुकसान झाली याला समोर जाऊन काही दिवसानी आरमोरी खरेदी विक्री सहकारी संस्थांचे केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी घरी ठेवलेले धान विक्रीसाठी केंद्रावर मोठ्या प्रमाणात आणले असता खरेदीचा कालावधी दिनांक ३० जून २०२५ पर्यंत असल्यामुळे यात जवळपास नवशेच्यावर शेतकऱ्यांनी आरमोरी खरेदी विक्री संस्थेच्या केंद्रावर नोंदणी केली असता यातील चारशे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झाली पण अजुन ही पाच पाच सहा
दिवसा पासून ७० ते ८० ट्रॅक्टर धान भरलेले पावसाच्या पाण्यात भिजुन वापत केंद्रावर उभे आहेत यात अजून जवळपास सहाशे शेतकरी धान विक्रीपासुन वंचित आहेत तसेच खरेदी कालावधी मध्ये ऑनलाईन पोर्टल वर अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे धानाचे बिल बनविणे मुदतीच्या आत होऊ शकत नाही, ट्रक्टर्स च्या रांगाच रांगा आरमोरी खरेदी विक्री संस्थेच्या पळसगाव उपकेंद्र व आरमोरी बडी केद्रावर असून मुदतीचे आत धानाचा काटा होणे शक्य नाही तरी वरील अडचणी लक्षात घेता धान खरेदीचा कालावधी वाढवून मुदत वाढ देण्यात यावी.तसेच धान खरेदी चे किक्टलचे उद्दिष्ट कालच सरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्यामुळे पंधरा दिवसांची मुदतवाढ व उद्दिष्ट वाढवुन देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी आरमोरी तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार रामदास मसराम यांच्या कडे केली असता आमदार रामदास मसराम यांनी यांची दखल घेऊन स्वतः आमदार
मसराम यांनी आरमोरी बडी येथील खरेदी विक्री संस्थेच्या केंद्राला काल दि. २८ जुनला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणल्या असता जागच्या जागी शेतकऱ्यांचे धान भरलेले ट्रॅक्टर पाण्यात भिजत होते काहीचे धान ट्रॅक्टर मधेच वापले दिसल्याने शेतकऱ्यांचे विक्री अभावी नुकसान होत असल्याने प्रशासना विरोधात रोष व्यक्त करुण आधारभूत उन्हाळी धान खरेदी केद्राना पंधरा दिवसांची मुदतवाढ व उद्दिष्ट वाढऊन देण्यात यावे अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदनातून मागणी केली होती याची दखल घेऊन राज्य मत्री कदम या समधी सकारात्मक भुमिका घेऊन मुदतवाढ व उद्दिष्टात वाढ करण्यात येईल असे आश्वासन आमदार मसराम यांना दिले आहे.
.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम भिमराव बारसागडे जावेद भाई विलास पोटफोडे होमराज प्रधान देविदास प्रधान भुमेश्वर राऊत सोमेश्वर धोटे राजु ढोरे रुषी प्रधान तात्याची भोयर नेताजी धोटे चद्रभान निबेकार तुषार दवै यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment