शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस रुग्णांना फळ वाटप करून केलं साजरा...



गडचिरोली
सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव साहेब हे शिवसैनिकांचे आस्थेचे स्थान आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असुन मातोश्री हे समस्त महाराष्ट्रातील मराठी माणसाचे आदराचे स्थान आहे. अशा बहुमुल्य व्यक्तीमत्वाचा आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हा



गडचिरोली तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. नंतर काहीक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान रोवणाऱ्या महिलांना पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा शेवटी कार्यालयात येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील पोरड्डीवार विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे महिला संघटिका छायाताई कुंभारे समन्वयक राजेंद्र लांजेकर तालुका प्रमुख गजानन नैताम तालुका प्रमुख घनश्याम कोलते नवनाथ उके प्रविण रामगिरवार युवा सेना जिल्हा प्रमुख पवन गेडाम शहाबाज शेख राहुल भारसाकडे प्रदिप झाडे सचिन बोधनकर गंगाधर चंदावार सुनंदा आतला शितल ठवरे मंगला बिरनवार शिमा पाराशर ‌छबुताई पीसे कल्पना साखरे गिता मेश्राम आरती खोब्रागडे विना निम्बेकर गिता सोनोने धनश्री पवार शारदा वनकर स्वाती जंपलवार आणि शिवसैनिक उपस्थित होते .


0/Post a Comment/Comments