सती नदीचा रपटा गेला पहिल्याच पावसात वाहून तालुका मुख्यालयाशी ग्रामस्थांचा संपर्क तुटला....




गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्सेवा 
 गडचिरोली 
मुनिश्वर बोरकर .
संपादक
कूरखेडा-
तालूका मूख्यालयाशी ग्रामीण भागाला जोडणारा कुरखेडा जवळील सतीनदीचा पूलाचे बांधकाम सूरू असल्याने तयार करण्यात आलेला रपटा आज गूरूवार रोजी सकाळी ९.३० वाजेचा सुमारास पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथून कोरची,मालेवाडा,कढोली तसेच नदीपलीकडील गावाकडे जाणारा महत्वाचा मार्ग बंद झालेला आहेत .
ब्रम्हपूरी ते देवरी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सूरू आहे या अंतर्गत कूरखेडा लगत वाहणाऱ्या सतीनदीचा जून्या मात्र मजबूत असलेला पूलाला तोडत नविन व मोठ्या पूलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे यावेळी या महत्वाचा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये याकरीता पूलाचा बाजूनेच मोठे पाईप टाकत व पाण्याचा प्रवाहात रपटा वाहून जाऊ नये म्हणून सिमेंट क्रांकीट ची संरक्षण भिंत बांधत रपटा तयार करण्यात आला होता मात्र सदर रपटा पहिल्याच पावसाचा तडाका सहन करू शकला नाही व दोन ठिकाणावरून या रपट्याला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सदर मार्ग बंद पडल्याने व जवळपास पर्यायी मार्ग नसल्याने नदीपलीकडील गोठणगांव,जांभूळखेडा,येरंडी,मालदूगी, चांदागड,सोनसरी,शिवणी तसेच परीसरात मोठ्या संख्येत असलेल्या गावातील नागरीकाना तालूका मूख्यालयाशी संपर्क करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे तसेच या मार्गावरून मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थी,रूग्न, शासकीय कार्यालयीन कामाकरीता नागरीक,येथील आस्थापणेत ग्रामीण भागातून येत मजूर म्हणून काम करणारे चाकरमाने तसेच दूध संकलन केंद्रात तसेच शहरवासीयाना दूध पूरवठा करणारे दूध उत्पादक शेतकर्याना मोठी अडचण निर्माण झाली आहे. येथील व्यवसायावर सूद्धा मोठा परीणाम पडणार आहे या मार्गावरील बस वाहतूक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक सूद्धा बंद पडल्याने नागरीकात मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे या मार्गाला पर्यायी मार्ग असलेला आंधळी(नवरगांव )येथील पूल १० ते १२ कीलोमीटर अधिक अंतराचा तसेच अरूंद व गावातून गेलेला मार्ग हा सूद्धा अरूंद व कमी क्षमतेचा असल्याने जड वाहतूक येथून शक्य नाही या पूलाची क्षमता नसल्याने ती धोक्याची ठरण्याची शक्यता सूद्धा आहे.
सदर नवनिर्मित पूलाचा बांधकामात झालेली दिरंगाई व नियोजन शून्यते मूळे तालूका वासीयावर हा कठीन प्रसंग आलेला आहे तसेच बांधकामाचा दर्जाबाबद ही प्रश्न चिन्ह उपस्थीत करण्यात येत या संपूर्ण बांधकामाची चौकशी करावी व कार्यवाही करावी अशी मागणी तालूका वासीयाकडून करण्यात येत आहे.
रपटा वाहून गेल्याची वार्ता पसरताच नागरीकांची नदीचा दोन्ही तिरावर बघण्याकरीता मोठी गर्दी झाली होती यावेळी कोणतीही दूर्घटणा घडू नये म्हणून कूरखेडा पोलीस स्टेशन चे साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांचा नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे तसेच दोन्ही बाजूला खंदक खोदत व बैरेकेटिगं लावत या मार्गावर कोणतेही वाहन येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे
सदर मार्गावरील रपटा हा कमकूवत असल्याने यापूर्वीच जिल्हाधिकारीनी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्याचे निर्देश दिले आहे त्याप्रमाणे हलकी व जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची सूचणा स्थानिक प्रशासनाला देण्यात येत हा मार्ग खंदक खोदत व बैरेकेटिगं लावत बंद करण्यात आला आहे व येथे कोणताही धोका होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त सूद्धा तैनात करण्यात आला आहे
रमेश कूंभरे
तहसीलदार कूरखेडा

0/Post a Comment/Comments