तरुणीने वैनगंगा पात्रात उडी घेऊन संपविले आपले जीवन जीवन संपविन्या मागचे कारण "मात्र, गुलदस्त्यात



गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा
ब्रह्मपुरी 
प्रतिनिधी 
ब्रह्मपुरी येथील एक तरुणी वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन तिने स्वतःचे जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे .ब्रह्मपुरी येथील डॉक्टर बिजवे यांची मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटना 16 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अंदाजे सहा वाजे घडल्याची माहिती मिळाली ईशा घनश्याम बिजवे व 24 वर्षे असे जीवन संपविणाऱ्या तरुणीचे नाव आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार इशा बीजवे ही तरुणी आपल्या दुचाकीने एम एच 49 झेड 41 76 या दुचाकीने वैनगंगेच्या नदी पुलावर सायंकाळच्या सुमारास आली दुचाकी पुलावर उभी करून पायातील चप्पल काढून त्या दुचाकी वर ठेवल्या आणि वैनगंगा नदीमध्ये उडी घेतली. मात्र उडी घेतलेल्या ठिकाणी पाणी कमी असल्याने ती बचावली . मनामध्ये आत्महत्येचा दृड नीच्यय असल्याने ते पुन्हा लगेच जास्त पाणी असलेल्या ठिकाणी उडी घेतली त्या ठिकाणी जास्त पाणी असल्याने ती वरती आली नाही मात्र रस्त्यावरून ये
जा करीत असणाऱ्या लोकांनी तिला वाचवण्यासाठी कोणी धावले नाही कोणाची हिम्मत झाली नाही.लोक मात्र त्या युवतीचा व्हिडिओ बनविण्यात मग्न झाले याला आचर्य म्हणावे लागेल. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम चालू केली असता बुधवारी उशिरापर्यंत तिच्या मृतदेह आढळून आला युवतीने आपल्या मनामध्ये दृढ निश्चय करून आत्महत्येचे एवढे मोठे पाऊल कसे ?काय उचलले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. रस्त्यावरून येजा करणाऱ्या लोकांनी तरुणीला जर वाचवीण्यासाठी पहिल्या वेळात खटपट केली असती तर ती कदाचित वाचली असती असे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे. घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे

0/Post a Comment/Comments