आमगाव महाल येथील बस स्टॉपला आले पावसाच्या दिवसात तलावाचे स्वरूप, ग्रामपंचायत प्रशासनाची डोळेझाक....

गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा 

पी .के .सातार

 तालुका प्रतिनिधी

 चामोर्शी 
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव महाल येथील बस स्टॉप समोरील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने पावसाळ्याचे दिवसांमध्ये पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत असल्याने बस स्टॉप समोर तलावाचे स्वरूप पहावयास मिळत आहे .यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे कानाडोळा करित असल्याचे पाहावयास मिळत आहे.  बस स्टॉप समोरील रस्त्यावरील खड्डे याला डागडुजी करून योग्य प्रकारे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी  आणि सामान्य नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यापासून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी आता आमगाव महाल येथील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

0/Post a Comment/Comments