सावली तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार.... आढावा बैठकीमध्ये कामात दिरंगाई व हयगय करणाऱ्यांना दिली तंबी....





गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्दसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक
सावली चंद्रपूर

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प होती. या विकास कामांना शीघ्र गतीने पुर्ण करुन जनतेच्या समस्या तातडीने सोडवा असे निर्देश राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावली येथिल पंचायत समिती सभागृह येथे आयोजित सभेत दिले.

आयोजित आढावा सभेस सावली तहसीलदार प्रांजली चरडे, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, वैद्यकीय अधिकारी रामटेके, सावलीचे पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू, माजी जि. प. बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, माजी प. स. सभापति विजय कोरेवार, तथा सर्व विभागाचे अधिकारी व सरपंच तसेच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ते योजना, घरकुल योजना, अंगणवाडी व शालेय वर्ग खोल्या बांधकाम, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत भवन इमारत बांधकाम, पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन योजना, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती, जिल्हा परिषद सिंचाई विभागाची विकास कामे, वनविभाग , जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,भूमी अभिलेख विभागा अंतर्गत सावली शहरातील मोजणी, महसूल विभाग,तालुका क्रीडा संकुल, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, गोसेखुर्द प्रकल्पा अंतर्गत फुटलेली पाईप लाईन, कंत्राटदारांनी केलेल्या चुका, तसेच चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेले व्हाल व त्यामुळे झालेले शेतकर्यांचे नुकसान तथा अन्य योजनांचा विस्तृत आढावा विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रं आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला.


नुकतीच आटोपलेल्या लोकसभा निवडणुक कार्य्रमाअंतर्गत लागू असलेली आचारसंहीता यामुळे विकास कामे ठप्प पडली होती. तर येणारा हंगाम हा पावसाळी हंगाम असुन यातुन सावली तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक यांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडवीण्यात याव्या. तसेच विकास कामांचा दर्जा उत्तम ठेवून कामे तातडीने पुर्ण करावे. तसेच विकास कामांत हयगय व दुर्लक्ष्य करणाऱ्या अधिकारी असो अथवा कंत्राटदार यांची गय केल्या जाणाऱ्या नाही अशी तंबी देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी प्रामुख्याने संबंधित विभागाचे सर्व अधिकारि, नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक , सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments