जंगली हत्तीने केली करपडा शेत शिवारातील धान्य पऱ्याची नुकसान, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली वन विभागाला मागणी...
गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा

दिनेश रामाजी बनकर 

 मुख्य संपादक 

जंगली हत्तीने केली करपळा शेत शिवारातील धान्य पऱ्याचीनुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली वन विभागाला मागणी
आरमोरी तालुक्यातील कोजबी जवळील नदीकिनारी असलेल्या करपडा शेतशिवारात जंगली हत्तीने दिनांक 22 6 2024 रोजी सकाळच्या सुमारास शेतामध्ये शिरकाव करून कोजबी येथील शेतकरी मनोहर मुकुंदा मुल्लेवार यांनी धान्य रोवनीकरिता लावलेल्या पऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे .यामुळे
 शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जंगली हत्ती हा शेत शिवारात एकटाच फिरत असून शेतीचा हंगाम सुरू झाल्याने शेतामध्ये जाण्याकरिता परिसरातील शेतकरी भयभीत अवस्थेमध्ये आहेत. वनविभागाने जंगली हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी कोजबि करपडा येथील शेतकरी वर्गातून आता जोर धरू लागली आहे.

0/Post a Comment/Comments