वयोवृध्द इसमाचा झाला खून ,आणि परिसरात मचली खळबळ....गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा

 नागपूर

प्राप्त झालेल्या माहितीनुसार

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या संत्रा नगरी म्हणून परिचित म्हणजेच नागपूर शहरात एका पेशाने वकील असलेल्या इसमाने आपल्या मुलाच्या मदतीने वयोवृद्ध इसमाची हत्या केल्याची घटना नागपूर शहरात घडली. ही हत्या दारूचा घोट घेत असताना उद्भभवलेल्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत ही घटना घडली आरोपी बाप आणि मुलगा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पेशाने वकील असलेले अश्विन वासनिक हे मृतक वयोवृद्ध इसमाचे कामगार न्यायालयामध्ये केस सांभाळत होते आणि वकील
 वासनिक आणि वयोवृद्ध इसम हे दोघेही एकाच परिसरात वास्तव्याने राहत होते यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होत सुरू होते आणि यामधूनच त्यांची चांगली मैत्री झाली होती. 27 मे रोजी वयोवृद्ध इसम हा वकील अश्विन वासनिक यांचे घरी रात्रीच्या सुमारास दारू पिण्याकरिता बसला होता. मात्र दारूचा घोट घेत असताना वयोवृद्ध इसम आणि वकील अश्विन वासनिक यांच्यामध्ये काही कारणांनी वाद झाला. वाद सुरू असताना अश्विन वासनिक यांचा मुलगा अविष्कार वासनिक हा सुद्धा तिथे आला आणि दोघांनी मिळून कुऱ्हाडीच्या लोखंडी दांड्याने वयोवृ द्ध इसम दिवाकर कराळे याच्यावर जोरदार वार केला यामध्ये वयोवृद्ध इसम दिवाकर कराडे यांचा जागीच मृत्यू झाला दिवाकर कराडे हे भारतीय वायुसेनेमधून निवृत्त होऊन ते एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होते. झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास जरीपटका पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments