पत्नीवरती कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा केला खून , गडचिरोली जिल्ह्यातील घटना....दिनेश रामाजी बनकर

 मुख्य सपादक 

गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा

मिळालेल्या माहितीनुसार

कोरची 

पत्नी आणि मुलगी घरामध्ये झोपले असताना 29 मे रोजी पहाटेच्या सुमारास पत्नी वरती कुराडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना कोरची जवळील बेतकाठी गावात घडली आहे अमरोतीन रोहिदास बंजार वय 35 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे .रोहिदास बंजार वय 40 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. रोहिदास व अमरोतीन यांचे यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते अशाचच त्यांना चार मुली अपत्य झाली यामध्ये इयत्ता नवव्या वर्गामध्ये शिकणारी मोठी मुलगी छत्तीसगडला आपल्या मामाकडे गेली होती. दोन मुली आपल्या आजीच्या घराकडे जाऊन झोपी गेल्या होत्या .याच संधीचा फायदा घेऊन रोहिदासने 29 मे च्या पहाटे सुमारास आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार केले आणि कुऱ्हाड घेऊन रोहिदास गावातील चौकामध्ये गेला आणि ती कुऱ्हाड रक्ताने माखली असल्याने तिला पाण्याने धुवून ती झुडपामध्ये फेकून दिली .घरामध्ये झोपली असलेली मुलगी जागी झाली असता तिला तिची आई रक्ताच्या थारोळ्यात मृत

 अवस्थेत पडली दिसल्याने तिने एकच आक्रोश केला यामुळे आरोपीचा भाऊ नोहारसिंग जागा झाला आणि त्याने काही गावातील लोकांच्या मदतीने आरोपी रोहिदास ला पकडून त्याला दोराने खांबाला बांधून ठेवले .घटनेची हकीकत पोलीस स्टेशनला कळवून आरोपी रोहिदासला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले घटनेचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे हे करीत आहेत चारही मुली आईविना पोरक्या झाल्याने त्यांच्यावरती मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे .

0/Post a Comment/Comments