कुरखेडा तालुक्यातील धनेगाव गट ग्रामपंचायत चा वाली कोण?

 



गडचिरोली
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
 गडचिरोली- 
कुरखेडा तालुक्यातील धणेगाव गट ग्रामपंचायत चे ग्रामसेवक नेहमीच गैरहजर राहतात. सदर ग्रामपंचायत कडे बिडिओ पंचायत समिती कुरखेडा ने लक्ष घ्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. धणेगांव ग्रामपंचायत घणेगांव , कसारी व घणेगाव टोला मिळून गट ग्रामपंचायत असुन सदर ग्रामपचायत दुर्गम भागात असुन सदर ग्रामपंचायत पेशा अर्तगत आदिवासी वस्ती असुन येथील ग्रामसेवक ग्रामपंचायत मधे नेहमीच गैरहजर राहतात. त्यामुळे गावातील शेतकरी , मजुर व विदयार्थी यांचे कामे होत नाही. गावाचा विकास कोसो दुर आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असुन पावसाळा दिड महिन्यावर येऊन ठेपला असुन नाल्या साफ नाहीत. ग्रामसेवक अभावी घरटॉक्स पुर्णपणे वसुल झालेले नाही. ग्रामसेवक १५ दिवसातून एकदाच येतात असे ऐकविल्या जात आहे.त्यामुळे लोकांचे कामे होत नाही. तरी अश्या ग्रामसेवकावर बिडिओ कुरखेडा पंचायत समिती कुरखेडा यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यता गावकरी कधिही आंदोलन करू शकतात असे घणेगाव ग्रामस्ताची तक्रार आहे.


0/Post a Comment/Comments