परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली अंतर्गत चोप येथे नववे हवनकार्य निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक संपन्न


परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली अंतर्गत वडसा तालुक्यातील चोप वतीने येथे दि २१/४/२०२३ शुक्रवारला नववे हवनकार्य निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक आयोजित करण्यात आली. सकाळी ८.०० वाजता हवनकार्य पार पडले. त्यानंतर मानवधर्माची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेमुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर अल्पोपहार देण्यात आला. व लगेच एका भगवंताच्या  प्रत्यक्ष चर्चा बैठकीला सुरुवात झाल 

           चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नियोजन व देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. गोविंदराव दोनाडकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नानाभाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली , चोप गावचे प्रथम नागरिक नितीनजी लाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दशरथजी मडावी,नियोजन समितीचे उपाध्यक्ष फाल्गुनजी मानकर, दिवाकराजी ठेंगरे अध्यक्ष सेवाभावी संस्था गडचिरोली, गुणवंतजी फटे उपाध्यक्ष सेवाभावी संस्था गडचिरोली, प्रशांत ठेंगरे सचिव केंद्रीय समिती गडचिरोली, गिरिधरजी लांजेवार केंद्रीय समिती गडचिरोली, वनमालीजी डोंगरवार मार्गदर्शक ,  फुलसिंगजी अजमेरे दुधरामजी बरलावार आदी मान्यवर उपस्थित होते.

                 चर्चासत्रात मान्यवरांनी अंधश्रध्दा, वाईट व्यसन, हुंडाबळी यावर आधारित विचार व्यक्त केलेत. चर्चासत्राला परिसरातील सेवाभावी संस्थेचे बहुसंख्य सेवक,सेविका, बालगोपाल उपस्थित होते. याशिवाय चर्चासत्रादरम्यान सेवक सेविका यांच्या वतीने मानवधर्मावर आधारीत गीतांवर डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य सादर केले.

            सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रशांत ठेंगरे,संचालन मानिकजी मेश्राम तर आभाप्रदर्शन मार्गदर्शक प्रमोदजी गोटेवर मु.ता. मुलचेरा यांनी मानले. शेवटी सायंकाळच्या प्रार्थनेने चर्चासत्राची सांगता करण्यात आली.  नमस्कार

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

0/Post a Comment/Comments