रेखेगाव बिलासपूर रोड ची दैनिय अवस्था...

गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - मछली बिलासपूर हळदवाही भाडभिडी रेखेगांव रोडची आज दैनिय अवस्था झाली आहे. रोडवर खड्डेच खड्डे आहेत तेव्हा सदर रोडची डागडुगी त्वरीत करावी अशी मागणी संबंधित विभागाकडे आदिवासी सेवक शिवाजी नरोटे यांनी केलेली आहे.
सदर रोडची पाहणी केली असता या रोडवरून फोर व्हीलर जाणे कठीण झालेले आहे. या भागातील


 शाळेकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करून शाळेत जावे लागते तेव्हा संबंधित विभागाकडे लक्ष घ्यावे अशी मागणी इलाक्याचे अध्यक्ष रामदास पुंगाटी सचिव राजु नरोटे अजय पुडो सोनु कोवाची अनिल पदा शिवाजी पदा आदिनी केले आहे

0/Post a Comment/Comments