अरण्य" चित्रपटाचे पोस्टर अनावरण गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पार पडले...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली - लेखक व दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांच्या -अरंण्य या चित्रपटाचे पोस्टर अनावरण गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अरण्य ' हा चित्रपट गडचिरोली जिल्हयातील आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा वास्तववादी कथानक असुन आदिवासी समाजांतील सामान्य नागरिकांचे जिवन दर्शविणारा ठरू शकतो सदर चित्रपटात आदिवासींच्या जीवनातील झलक दाखविणारा आहे.
सदर चित्रपटात अभिनेते हार्दिक जोशी हतिका पाटिल चेतन चावडा सुरेश विश्वकर्मा विजय निकम आदि कलाकार प्रमुख भुमीका साकारणार आहेत. सदर चित्रपट १९ सष्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.
अरंण्य , चित्रपटाच्या पोस्टर अनावरण प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) एम. रमेश अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक ( प्रशासन ) गोकुल राज जी तसेच लेखक - दिग्दर्शक अमोल करंबे शरद पाटिल आणि अंजली पाटिल प्रामुख्याने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments