गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा .
मंगेश बन्सोड
प्रतिनिधी
गडचिरोली: नारायणपूर सीमेवरील असलेल्या कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याचे विश्वासार्ह गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री. एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C60 ची 19 पदके आणि सीआरपीएफ QAT दोन पदके सदर जंगल परिसरात रवांना करण्यात आली होती या भागात सुरू असलेल्या प्रचंड
पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके सकाळी जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले सुमारे आठ तास चाललेला चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता एकूण चार जहाल माओवाद्यांचे मृत्यू देह १ पुरुष तर ३ महिला मिळून आले आहेत .याशिवाय घटनास्थळावरून १ SLR रायफल २ INSAS रायफल व १ 3003 रायफल जप्त करण्यात आले आहेत सदर भागात उर्वरित मौवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवादी विरोधी अभियान सुरू आहेत तसे माहिती पोलिसांना दिली आहे...
चारपैकी काही चकमकीत ठार झालेले नक्षल माओवादी हे गडचिरोली जिल्हयातील आहेत की काय? त्याच्यावर किती लाखाचे बक्षिस होते हे आत्मसमर्पित नक्षलवाद्या कडून ओळख पटविण्यासाठी त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात आणण्यात आलेले आहे. अशी माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांनी माहिती दिली
Post a Comment