गणेशोत्सव निमित्त श्री साईबाबा मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी... मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन संपन्न..


गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 



देसाईगंज
 श्री साईबाबा मंदीर, हनुमान वार्ड/राजेंद्र वार्ड, देसाईगंज यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्ताने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीर भव्य उत्साहात आयोजित करण्यात आले. हे शिबीर  दिनांक ३० ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत संपन्न झाले.

मोफत आरोग्य सेवा...
या शिबिरात BP, Blood Sugar, ECG, दंत तपासणी (डॉ. अश्विन ढोले, वडसा), नेल्सन हॉस्पिटल, धंतोली नागपूर यांच्या तज्ञ डॉक्टर्स द्वारे नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यासोबतच सृष्टी डोळ्यांचा दवाखाना, नंदनवन, नागपूर यांच्या माध्यमातून मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मा वाटप करण्यात आले. शिबिराचा लाभ तब्बल ३७५ नागरिकांनी घेतला.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन... कार्यक्रमाचे फित कापून उद्घाटन मा. आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून मोतीभाऊ कुकरेजा, विशेष अतिथी आमदार रामदासजी मसराम, माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी, भाजपा शहराध्यक्ष सचिन खरकाटे, जेसाभाऊ मोटवानी, अनिल मुल्कुलवार सर, विलास भाऊ ढोरे, किशोर तलमले, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते पंढरीजी नखाते, धनपाल मीसार सर, तसेच अनेक डॉक्टर प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मा.आमदार कृष्णाजी गजबे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले –
"समाजातील प्रत्येक घटकाच्या आरोग्याचा विचार करणे ही खरी समाजसेवा आहे. अशा शिबिरांमुळे सामान्य जनतेला मोफत तपासण्या व उपचार उपलब्ध होतात, यामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढते. श्री साईबाबा मंदीर व गणेश उत्सव मंडळ सातत्याने समाजकार्यात पुढाकार घेतात, त्यांचं अभिनंदन करतो. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी."

यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments