गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
मंगेश बनसोड
प्रतिनिधी कुरखेडा
कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा रस्त्यावरील चिखलात ट्रक फसल्याने वाहतुक ठप्प झाली व नाहकच सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला.ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे मागील दोन दिवसापासून कुरखेडा कोरची या राष्ट्रीय महामार्गावरील गोठणगाव फाटा ते जांभुळखेडा रस्त्यावरील चिखलात ट्रक फसल्याने येथील वाहतूक ठप्प होत वाहनधारकांसह सामान्य नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला.
यात्रासामुळे नागरिकांमध्ये आक्रोसा ची भावना निर्माण होत असून गोठणगाव फाट्यावरती गाडी ड्रायव्हर सह सामान्य नागरिकांमध्ये वाद निर्माण होत असून या
त्रासाला लवकरात लवकर ठेकेदार आणि त्यावरील प्रशासनांनी सामोरे जाऊन लवकरात लवकर त्या रस्त्याची व्यवस्थापना करून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशी भूमिका लक्षात घेऊन गोठणगाव ते जांभुळखेडा मार्गावरील चिखल आणि रस्ता दुरुस्ती करावा..
प्रशासनाने सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष करू नये असा आरोप सामान्य नागरिकांनी दर्शविला आहे.
Post a Comment