नागेपल्ली येथील लक्ष्मी प्रसन्न रामलू मामाच्या हॉटेलची चवच न्यारी..!

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 


संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली
अहेरी -
आलापल्ली जवळील नागेपलीचे लक्ष्मी प्रसन्न रामलू मामाचे हॉटेल मागील पन्नास वर्षापासून अविरतपणे इमाने इतबारे अस्सल नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद देत आहेत या हॉटेलमध्ये जेवणारे जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिक व विविध विभागातील जुने अधिकारी कर्मचारी व विदर्भातील अनेक व्यापारी व ठेकेदार मंडळी नियमित या हॉटेलमध्ये नॉनव्हेजचा आस्वाद घेत असतात . लक्ष्मी प्रसन्न हॉटेलचे मालक रामलू जेट्टी तेलंगणा येथून नागेपल्ली येथे स्थायिक झाले. त्यांच्या कुटुंबात कोणीच नाही ते एकटेच या ठिकाणी वास्तव्य करतात आणि दररोज ताजे गरमा गरम चिकन मटन तयार करून आपल्या हॉटेलमध्ये ठेवत असतात आणि यांच्या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक यांना फक्त दोनशे रुपये मध्ये चिकन थाली आणी मटन थाली ची सेवा देत आहेत. सदर हॉटेल लहान जरी असेल तरी मात्र येथील चव इतर हॉटेल पेक्षा कमी नाही आज या हॉटेलमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, विदर्भ अध्यक्ष जावेदभाई सय्यद यांनी सदिच्छा भेट दिली व येथील नॉनव्हेज जेवणाचा स्वतः आस्वाद घेतला यावेळी अस्सल चुलीच्या घरगुती जेवणाचे आस्वाद आम्हाला या हॉटेल मधे मिळाला, रामलू मामा नावाने प्रसिद्ध असलेले
रामलू जेट्टी हे अतिशय साधे आणि सरळ स्वभावाचे व्यक्ती आहेत, त्यांना पैश्याचा मोह नाही आजपर्यंत प्रसिद्धीपासून दूर असलेले व सर्वसामान्य ग्राहकांना गावठी लज्जतदार चविष्ट नॉनव्हेज जेवणाची सेवा भावी वृत्तीने व्यवस्था करून देणारे अहेरी नागेपल्ली येथील सर्वात जुने हॉटेल आहे, त्यांचा हॉटेलचा हॉटेल समोर लावलेल्या बोर्ड वरून दिसून येतो त्यांनी आजपर्यंत आपल्या हॉटेलचा कलरवाला बोर्ड सुद्धा तयार केला नाही यावरून त्यांना आम्ही विचारलो असता, अरे बाबांनो बोर्ड आणि चमक दमक काय कामाची आहे? जर जेवण खाण्यासारखी नसेल तर



 माझ्या हॉटेलची जेवणच हा माझा ब्रँड आहे असे त्यांनी उत्तर दिले आजच्या या प्रचार प्रसिद्धीच्या काळात रामलू मामा जे गेल्या पाच दशकापासून सर्वसामान्य ग्राहकांना अस्सल गावठी जेवणाची व्यवस्था अगदी कमी पैशात करून देत आहेत हीच खूप खूप मोठी गोष्ट आहे, यावेळी जावेद भाऊ आणि मला रामलू मामा यांच्यासोबतफोटो काढण्याचा व त्यांच्याबद्दल लिहिण्याचा मोह आवरला नाही खरोखरच या ठिकाणाचे नॉनव्हेज जेवण खूप छान आणि चवदार होते आम्ही आजपर्यंत संपूर्ण देशभरातील अनेक राज्यांमध्ये फिरलो ,एव्हाना बाहेर देशांमध्ये सुद्धा अस्सल नॉनव्हेज चा आस्वाद घेतला परंतु नागेपल्ली येथील रामलू मामा यांच्या नॉनव्हेज जेवणाची चवच



 घरगुती होती कारण रामलू मामांनी सांगितले,आजही मटन चिकन शिजवताना कुठल्याही प्रकारचा प्रेशर कुकरचा वापर करत नाही, त्याचप्रमाणे मसाला सुद्धा कोणत्याही मिक्सर मशीन मध्ये तयार केला जात नाही तर अस्सल जाता-पाट्यावरच मसाला सुद्धा आपल्या गावठी पद्धतीने तयार करतात व संपूर्ण
नॉनव्हेज चिकन मटन चुलीवर काड्यावरच शिजवतात,
खरोखरच लक्ष्मी प्रसन्न हॉटेलचे मालक रामलू मामा यांच्या हॉटेलमध्ये जेवण नॉनव्हेज प्रेमी नागरिकांनी एकदा अवश्य रामलू मामा यांच्या लक्ष्मी प्रसन्न हॉटेलमध्ये भेट द्यावी,

0/Post a Comment/Comments