गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
आरमोरी
परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवा भावी संस्था गडचिरोली अंतर्गत आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे सुधाकर दुधबळे यांचे निवासस्थानी नव्वे हवन कार्य निमित्याने अंधश्रद्धा,व्यसनमुक्ती , हुंडाबळी, स्त्री भ्रूणहत्या समाज जनजागृति पर चर्चा बैठक दि. 27.8.2025 बुधवार रोजी पार पडली बैठकीचे अध्यक्ष स्थानि गोविंदरावजी दोनाडकर मार्गदर्शक वडसा यांची
उपस्थिती होती बैठकीचे प्रमुख अतिथी म्हणून दिवाकर जी ठेंगरे अध्यक्ष परमपूज्य परमात्मक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली फाल्गुनजी मानकर मार्गदर्शक कुरखेडा गुणवंत फटे मार्गदर्शक तळोद्यी अमरजी चट्टे मार्गदर्शक मालेवाडा विठ्ठलजी राऊत कोषाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली रवींद्रजी कांबळे मार्गदर्शक चुरमुरा
माणिक जी मानकर मार्गदर्शक कोजबी गायकवाडजी संचालक धनंजयजी दिगोरे मार्गदर्शक वडसा प्रकाश मेश्राम, राजेश्वरजी दुमाने ठाणेगाव येथील पोलीस पाटील तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष ठाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते चर्चा बैठकीचे विधिवत सुरुवात मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी सृष्टीचे निर्माता बाबा हनुमान जी मातोश्री आई वाराणसी यांच्या प्रतिमा चे पूजन करून करण्यात आली चर्चा बैठकीमध्ये मान्यवरांकडून समाजात
घडणाऱ्या वाईट चालीरीती अंधश्रद्धा वाईट व्यसनामध्ये गुरफट लेला समाज स्त्रीभ्रूणहत्या आधी विषयावर उपस्थित सेवक सेविका यांना मार्गदर्शन करण्यात आले. चर्चा बैठकीमध्ये संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उलगडा करून थोर महापुरुषांच्या कार्याचे समाजाला लाभलेले योगदान आधी विषयावर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यात आले . चर्चा बैठकीचे प्रास्ताविक अमरजी चट्टे यांनी केले तर संचालन प्रशांत ठेंगरे सर यांनी केले चर्चा बैठकीचे
आभार प्रदर्शन रवींद्र कांबळी मार्गदर्शक यांनी मानले चर्चा बैठकीला परमपूज्य परमात्मा एक सेवाभावी संस्था गडचिरोली येथील संपूर्ण संचालक गण चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा आदी परिसरातील हजारोच्या संख्येने सेवक सेविका बाल सेवक यांची उपस्थिती होती
चर्चा बैठकीमध्ये छोट्या छोट्या सेविका बालीकांचे अंधश्रद्धा व्यसनमुक्ती श्री भृण हत्या समाज जनजागृती अधि विषयावर नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
Post a Comment