चामोर्शीत तान्हा पोळा उत्सव, बालगोपालांच्या आनंदात मा. खासदार डॉ अशोकजी नेते यांनी उपस्थित राहुन तान्हा पोळ्याच्या दिल्या शुभेच्छा...


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा
चामोर्शी ब्युरो 


चामोर्शी, दि. २३ ऑगस्ट २०२५ :
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजार चौक नगरपंचायतीच्या पटांगणात चामोर्शी शहरात भव्य तान्हा पोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. परंपरा कायम ठेवत यावर्षी कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ आईचवार,न.पं. चामोर्शी सभापती सौ.सोनाली ताई पिपरे, नगरसेविका प्रेमाताई आईचवार तसेच मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

या पारंपरिक तान्हा पोळ्याच्या सोहळ्यात मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी अध्यक्षपद भूषवून उपस्थित राहून बालगोपालांना प्रोत्साहित केले व जनतेला शुभेच्छा दिल्या.


मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले तान्हा पोळा व बैल पोळा हा उत्सव करणे आपली संस्कृती आहे. या निमित्ताने आपण सर्वधर्म समभाव जागृत करत एकत्र येतोय व एकोपा निर्माण होतो. आज बालगोपालांनी दाखवलेली सर्जनशीलता, छोट्या नंदीबैलांच्या मिरवणुका आणि निरागस आनंद पाहून मन भरून आलं. आपल्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमातून समाजात ऐक्य, आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतात.
या सुंदर आयोजनाबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो तसेच तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना प्रोत्साहन म्हणून माझ्याकडून एक छोटीशी भेट देत आहे, ती कृपया स्वीकारावी.”असे
पुढे बोलताना त्यांनी सर्व ग्रामस्थांना आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत सांगितले
“आपली परंपरा, आपला सण – याचं जतन व संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे. बालगोपालांचा आनंद असाच फुलत राहो, शेतकरी बांधवांच्या आयुष्यात समृद्धी नांदो.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.


यावेळी मंचावर प्रामुख्याने गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश जी बारसागडे,माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर,बंडुभाऊ नैताम, वासुदेव चिचघरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि लहान मुले, बालगोपाल उपस्थित होते.

या झालेल्या उत्सवात बालगोपालांनी नंदीबैल, शेतकरी रूप आणि विविध पारंपरिक वेशभूषा साकारून चामोर्शी शहरातील वातावरण अधिकच रंगतदार केले. खेळणी, रंगीबेरंगी सजावट, नृत्य, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तान्हा पोळ्याला विशेष आकर्षण लाभले.
या कार्यक्रमाचे संचालन रमेशजी अधिकारी,प्रास्ताविक आशिषभाऊ पिपरे तर आभार अमोलभाऊ आईचवार यांनी केले.

0/Post a Comment/Comments