गडचिरोलीचे सीईओ यांना हायकोर्टाचा दणका घाटंजी येथील अवैध मुरुम प्रकरण..


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर गडचिरोली


गडचिरोली:- यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी येथील एका ठेकेदारांची ट्राक्टर मुरुम चोरी करतात म्हणुन सदर ठेकेदाराची जेसिबी व ट्राक्टर जप्त केली असता ट्राक्टर मात्र रिकामीच होती त्यामुळे संबधित ठेकेदारांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपिठात धाव घेतली होती त्यामुळे न्यायालयाने यवतमाळ जिल्हयातील केळापुरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( C. 0) वर एक लाख ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला.
सविस्तर वृत्त असे की , यवतमाळ जिल्हयातील केळापुर येथील सागर भोयर व रविंद्र बिडकर यांचे जेसिबी व ट्राक्टर ने अवैध मुरुम उत्खनन होत आहे म्हणुन जेसिबि व ट्राक्टर जप्त केले होते.
मात्र जेसिबी उभी होती व ट्राक्टर रिकामेच होते तरीही उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी जेसिबी व ट्राक्टर जप्त केली होती जेसिबी व ट्राक्टर मालकांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपिठात धाव घेतली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अनिल पानसरे यांनी झालेली नुकसान भरपाई म्हणुन सुहास गाडे यांच्यावर १ लाख ५० हजार रुपयाचा दंड ठोठावून दंडाची रक्कम वाहन धारकांना 30 जुलै पर्यंत अदा करण्याचे आदेश दिलेत.

0/Post a Comment/Comments