जंगली रानटी हत्तीच्या कडपाचा वैरागड, सालमारा परिसरात ,2 00 हेक्टर शेतशिवरात हैदोस , पावसाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सतत आठ दिवसापासून रात्रंदिवस मुक्काम करून मोठ्या प्रमाणात पावसाळी धानपिक व बोरवेल पाईप सह इतर साहित्याचे जंगली हत्तीने केली नासधुस..

गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
 मुख्य संपादक 
गडचिरोली 


आरमोरी - गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तिन वर्षांपासून ओडिशा राज्यातील रानटी हत्ती छत्तीसगड मागे कोरची कुरखेडा देसाईगंज आरमोरी तालुक्यातील मजेवाडा पळसगाव पाथरगोटा येथील शेतकऱ्यांच्या धान व ईतर पिकाची मोठ्या प्रमाणात काही महिन्यांपूर्वी नुकसान करून तेच रानटी हत्ती गडचिरोली तालुक्यात जाऊन परत गेल्या सात महिन्यांपासून आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घालुन गेल्या आठ नऊ दिवसांपासून वैरागड सालमारा शेतशिवारात मोर्चा वळऊन जवळपास दोनशे हेक्टर शेतजमीनीतील शेतकऱ्यांचे काही दिवसांपूर्वी पावसाळी रोवलेले धान पिक जंगली रानटी हत्तीच्या कळपाने जवळपास ५० ते ६० च्या वरुण शेतकऱ्यांचे धान पिक पुणता नासधूस करुन नष्ट केले तसेच बोरवेल पाईप साहीत्य सोडाने फोडफाड करून शेतावरील निवारेच्या झोपड्या सोडाने मोडल्या यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे पिक हिरावून घेतले पहिलेच यातील बहुतेक शेतकरी बैकेकडुन पिक कर्ज घेऊन शेती करणारे असल्यामुळे बैकेचे कर्ज कसे भरायचे तर काहीं शेतकऱ्यांनी धान पिकाच्या उत्पादनावर अवलंबून राहुन खाजगी व्यापाऱ्यांकडुण उसने उदार करून बिजाई रोवणी खत औषधी नांगरणी केली धान निघाल्यावर परतफेड करु या आशेवर शेतकरी होते परंतु वारंवार होणाऱ्या नुकसानीस शेतकरी अडचणीत असलेची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना मिळतात वैरागड परीसरातील शेतकऱ्यांच्या धान पिकाची पाहणी करून यात शेकडो हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले असल्याचे दिसताच शासनाने प्रति एकर एक लाख नुकसान भरपाई देण्यात यावे बोरवेलचा लागलेला सर्व खर्च वनविभागाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मंजुर करण्यात यावे व इतर नुकसानभरपाई ची किमती नुकसार भरपाई देण्यात यावे यासह तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांच्या कडे केली होती यांची दखल घेऊन आमदार मसराम




 आमदार रामदास मसराम यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने देण्याचे निर्देश दिले तसेच झालेल्या रानटी हत्तीच्या कळपा पासून होणारी शेतकऱ्यांची धान पिक नुकसान भरीव देण्याचे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या तसेच बोअरवेल पाईप साहित्याची मिळमारी मदत हि नुकसानी पेक्षा नगण्य असल्यामुळे यात वाढ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत
यावेळी राजकुमार नदरधने अजय सोमनकार राजु पात्रीकर संजय खडाकर राकेश सोमकार रामभाऊ नदरधने विलास बावणे चंदु लाजीकर दिलीप गोटेफोडे चंद्रकांत आकरे दिवाकर बनकर लिलाधर मोटघरे दिनेश टेकाम यासह अन्य शेतकऱी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments