गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये दोन हेक्टर पर्यंत बोनस ची घोषणा केली . मात्र या घोषणेला बराच कालावधी लोटून गेलेला आहे मात्र अजून पर्यंत शेतकऱ्याला बोनस मिळाला नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडलेला आहे धानाचा बोनस मिळण्याकरिता शेतकऱ्यांना एक महिना प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी बोनस घोटाळा उघडकीस आला होता. आणि काही भूमिहीन शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणी करून खात्यावर बोनस चे पैसे टाकल्याचे उघडकीस आले होते . आणि या घोटाळ्याची शासनाकडे तक्रार सुद्धा झाली होती. या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेऊन बोनस घोटाळ्याची चौकशी लावल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी ऑनलाइन नोंदणी ऑनलाइन पिक पेरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पडताळणी करणार असून प्रत्येक संस्था फेडरेशन धान्य विक्री केंद्राला भेट देऊन याची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अंदाजे महिनाभर तरी बोनस मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे. अशी अंदाजानुसार माहिती मिळाली आहे.
Post a Comment