महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यशस्वी परंपरा राखली कायम, मनोज भाऊ वनमाळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी 



निकाल जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी या शाळेचा निकाल 86.6% लागलेला असून विज्ञान शाखेचा निकाल 96.53%व कला शाखेचा76.41%निकाल लागलेला आहे. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. त्यानिमित्त विद्यालयात एक छोटेखाणी सत्कार कार्यक्रम घेण्यात येऊन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व तोंड गोड करून सत्कार व कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माननीय मनोज भाऊ वनमाळी हे होते तर प्रमुख पाहुणे महात्मा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्यालवार, उपप्राचार्य विलास आंबोरकर हे होते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून कला शाखेतून कुमार वैभव देवराव कांबळे हा विद्यार्थी 86.17% गुण मिळवून जिल्ह्यातून ...... व तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.



पायल विलास डोरलीकर 81.17% गुण मिळवून द्वितीय तर सीमा भास्कर लाडवे ७१.३३% टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.
विज्ञान शाखेतून हर्षल वामन चौधरी यांनी 75.50% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर प्रेम कुमार गणेश दास 75.33% गुण घेऊन व क्रिश अजय खोब्रागडे ७२. १७ % टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेला आहे
तसेच MCVC शाखेतून कुमारी काजल जनार्दन मातेरे 62.50% गुण घेऊन प्रथम क्रमांक घेतलेला आहे. तेजस्विनी सुनील चन्ने 60% व पवन विश्वनाथ गराटे 53.50% गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय तृतीय आलेले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी व भावी आयुष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेले आहेत.

0/Post a Comment/Comments