गडचिरोली येथील मेडिकल कॉलेजमधील तीन शिकाऊ डॉक्टर नदीपात्रात बुडाले,प्रशासनाच्या वतीने शोध मोहिम सुरू..

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक 
मुनिश्वर बोरकर


 गडचिरोली. गडचिरोली - गडचिरोली मेडिकल कॉलेजचे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील शिकावू तिन डॉक्टर वैनगंगा (व्याहाड ) नदित बुडाले असुन शोध मोहीम सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार आज दि. १० शनिवारला MBBS च्या शिकावू डॉक्टरांना सुट्टी असल्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्याकरीता गडचिरोली वरून पाच कि.मी असलेल्या वैनगंगा नदिघाटावर आंधोळी



 करीता गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गोपाळ गणेश साखरे , पार्थ बाळासाहेब जाधव व स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे तिन शिकावू डॉक्टर वैनगंगा पाण्याच्या प्रवाहात बुडाले . घटनेची माहीती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदिप पुलरवार आपल्या चमूसहीत घटनास्थळी पोहचले असून आप्पत्ती



 व्यवस्थापन पथक सुद्धा पोहचले असून त्यांचेकडून शर्तीने शोध मोहीम सुरू आहे. यापूर्वी चंद्रपूर येथील तिन महिला याच नदिघाटावर बुडाल्या होत्या.

0/Post a Comment/Comments