हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरीचा एच एस सी निकाल उज्वल . विज्ञान शाखेचा निकाल १००टक्के...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी 


आरमोरी  : येथील हितकारीणी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरीचा इ. १२ वी (मार्च २०२५) चा निकाल अत्यंत गौरवास्पद लागला आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल ८९.४४% असून विज्ञान शाखेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. कला विभागाचा निकाल ८०.८२% तर वाणिज्य विभागाचा निकाल ८७.५०% इतका लागला आहे.

कला विभागात कु. कशिश पुण्यवान नागदेवते हिने ७९.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. अंकिता दीपक बन्सोड (६७.६७%) आणि कु. अपूर्वा भास्कर कवासे (६३.५०%) यांनीही चांगली कामगिरी केली.

वाणिज्य विभागात कु. कुनाल खुशाल कामथे (६५.६७%), ऊद्धव तुकाराम सौंदरकर (६१.१७%) आणि कु. अनुष्का देशराज पाटील (५५.83%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

विज्ञान शाखेत सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून कु. श्रुति श्रीहरी प्रधान (७७.१७%) हिने प्रथम, कु. अंजली देवेंद्र जगनाडे (७४.५०%) हिने द्वितीय आणि रुचित लोकमित्र हजारे (६८.८३%) याने तृतीय क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल हितकारिणी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश पोरेडडीवर, सचिव तेजराव बोरकर, शाळा समिती अध्यक्ष काशीराम शेबे, प्राचार्य जयदास फुलझेले तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments