आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव धान्य घोटाळ्यातील संस्थेच्या 5 संचालकांना झाली घटक , धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी बावणे व मेश्राम फरारच..


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो 


गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमध्ये 3 कोटी 95 लाख रुपयाचा धान खरेदी घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणांमध्ये कुरखेडा पोलिसांनी 10 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष पतीराम कोकडे व उपाध्यक्ष पंढरी दादगाये संचालक मंडळाचे सदस्य बाबुराव कवटकर न्यूसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे या 5 5 संचालकांना धान घोटाळे संदर्भाने अटक केली . या सर्वांना 11 मे रोजी न्यायालया समक्ष हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 15 मे पर्यंत पोलिस कोठडी




 सुनावली आहे .धान घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपी असलेले सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम अद्याप फरार असून या फरार आरोपीच्या पोलीस यांच्या वतीने शोध सुरू आहे. धान्य घोटाळ्यामध्ये सन 2023 24 आणि 2024 25 या कालावधीमध्ये दहा हजार क्विंटल धान्य आणि 34,601 बारदाना गायब असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर 19 एप्रिल रोजी बावणे विपण अधिकारी सी डी कासारकर एच व्ही पेंदाम व इतर 17 जनावर कुरखेडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता .तपासात मेश्राम यांनी निरक्षर शेतकऱ्यांचे सातबारे उतारे ऑनलाइन वापरून बिल बनवले तयार केले आणि धान्य विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून सदर रक्कम मेश्राम यांच्या खात्यात वडती करण्यात आली होती. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी सामान्य जनतेतून मागणी होत आहे. मुख्य आरोपी फरार



 असताना निरक्षर शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय पोलिसांनी मोठ्या माशावर कारवाई करावी या प्रकरणाने सहकारी संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पोलीस प्रशासनाने संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची सखोल छाननी सुरू केली असून फरार आरोपीचा शोध पोलीस प्रशासनाने तीव्र गतीने चालू केला आहे. जनतेकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे . आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव शिरपूर येथील संचालक अध्यक्ष व्यवस्थापक यांची सखोल चौकशी करून यांना कठोरातील कठोर कारवाई करावी अशी चर्चा आता सामान्य जनतेत रंगू लागली आहे.

0/Post a Comment/Comments