सूर्यडोंगरी येथील मक्का पिकात हत्तीने धुडगूस घालून शेतकऱ्यांचे केले मोठे नुकसान, मक्का पिकाची नुकसान पाहून शेतकऱ्यांचे अश्रू झाले आणावर...

गडचिरोली सुपर फास्ट 

न्यज वृत्तसेवाआरमोरी 



आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर येत असलेल्या सूर्य डोंगरी येथे 20-3-2025 गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तीने शेतकऱ्यांच्या मक्का पिकांमध्ये धुडगस घालून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे . सूर्य डोंगरी परिसरात मागील सहा दिवसापासून जंगली हत्तीने आपले बस्तान मांडले आहे . दिवसभर आराम आणि रात्रीच्या सुमारास चराई करणे अशी हत्तीची दिनचर्या आहे. 32 हत्तीच्या कडप शेतकऱ्यांचे उभ्या असलेल्या मक्का व ध्यानाच्या पिकामध्ये शिरकाव केल्याने भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आणि शेतकऱ्यांचा जीव मेडकुटीला आला आहे. सूर्य डोंगरी येथील शेतकऱ्यांनी सकाळच्या सुमारास शेताकडे धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली असता. मका व धान्य पिकाची नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी वाघाने




 धुमाकूळ घातला होता आणि आता हत्तीचा धुमाकूळ सुरू झाल्याने परिसरातील जनतेच्या मनात मोठे भय निर्माण झाले आहे . वनविभाग मात्र गावांमध्ये दवंडी पीटून जंगली हत्तीच्या जवळ जाऊ नका जंगली हत्तींना हाकलू नका शेतकऱ्यांचे धान्य पिकाचे मका पिकाचे




 नुकसान झाले तरी चालेल आणि शेतकऱ्यांचा जीव गेला तरी चालेल असे सुद्धा आता शेतकरी वर्गातून व परिसरातील जनतेतून बोलले जाऊ लागले आहे. वनविभागाने हत्तीच्या कळप पीटाळून लावण्याकरीता योग्य तो निर्णायक उपायोजना कराव्यात आणि सामान्य जनतेला व शेतकरी वर्गांना न्याय द्यावा अशी मागणी आता गडचिरोली जिल्ह्यातील जनतेमधून जोर धरू लागली आहे .
नुकसान झालेले शेतकरी
1) प्रकाश हजारे ,लालाजी मेश्राम ,मुखरू हजारे ,कालिदास मेश्राम ,सुरेश मेश्राम ,थांबदेव मडावी ,येणूबाई हजारे ,देविदास मेश्राम ,सुनील मेश्राम आधी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

0/Post a Comment/Comments