कौटुंबिक वादातून पतीच्या मारहाणीत पत्नीचा झाला मृत्यू ,,, आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील घटना....





गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 
वैरागड :- येथील कहार मोहल्यात रहिवासी असलेला राजू उर्फ पन्ना परसराम पंडेलगोत (वय 35 वर्ष) याचे पत्नी मृत किरण राजू पंडेलगोत (वय 30 वर्ष) हिचा सोबत कौटुंबिक वाद होऊन मारहाणीत किरणचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार धान्याचे उचल करणारा शेतमजूर येथील कहार मोहल्ल्यात रहिवासी असलेला राजू पंडेलगोत याचा पत्नी किरण सोबत कौटुंबिक वाद निर्माण झाला रागाच्या भरात राजूने आपल्या पत्नीस हाताने मारहाण केले असता किरण खाली कोसळून शरीरास गुप्त मार लागल्याने बेशुद्ध पडली. त्याच अवस्थेत त्यांच्या घरच्या परिवाराने तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले असता वैद्यकीय अधिकारी विजय धुमाळे यांनी तपासणी केले असता सदर महिला मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी धुमाळे आणि पोलीस पाटील गोरखनाथ भनारकर यांनी आरमोरी पोलीस विभागास याची माहिती दिली असता पोलीस विभागाने तत्काळ घटनास्थळी येऊन राजू पंडेलगोत याला अटक केले. आणि शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले.



झालेल्या घटनाप्रसंगी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक प्रदीप लांबतुरे पुढील तपास करीत आहेत. मृतक किरण हिला नऊ वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाची मुलगी आहे हे महत्त्वाचे.



0/Post a Comment/Comments