तरुणाच्या जीवनातील दिवाळीचा दिवस ठरला अखेरचा श्वास....






गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली (अहेरी )
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 

दिवाळी सणाच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना शुक्रवार रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली .  तेजस राजूभाऊ बोम्मावार वय 21 वर्ष राहणार वांगेपल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की राजू बोम्मावार यांचे वांगेपल्ली येथे हार्डवेअरचे दुकान असल्याची माहिती आहे. आणि त्याला दोन अपत्य सुद्धा आहेत राजू पवार यांचा मोठा मुलगा तेजस हा पुण्यामध्ये एमबीएचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. मात्र तो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी आला होता. सकाळी तो मित्राच्या सोबत प्राणहिता नदीवर




 आंघोळ करण्याकरिता गेलेला होता परंतु आंघोळ करीत असताना त्याचा तोल पाण्यामध्ये गेला आणि त्याला पाण्याचा अंदाज कळला नाही यामुळे तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा नदीतील खोल पाण्यामध्ये तोल जावून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन मृत्काचा शव बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून




 शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला परिवारातील तरुण मुलगा एकाकी गेल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तरुणाच्या जीवनातील दिवाळीचा दिवस अखेरचा श्वास ठरल्याचे जनमानसात बोलले जात आहे .
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करित आहे.

0/Post a Comment/Comments