गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
बदलापूर : मैत्रिणीकडे
वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या मित्रांनी बलात्कार केल्याचे प्रकरण बदलापूरमध्ये उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तिघांना अटक केली असून, न्यायालयाने सोमवारी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बदलापूर पूर्व भागातील पीडित तरुणी ४ सप्टेंबर रोजी रात्री शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका मेश्राम हिच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. तेथे भूमिकाने आपल्या दोन मित्रांना बोलावले होते.
रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकले. त्यामुळे ही तरुणी बेशुद्ध
झाली. त्याचा फायदा घेऊन या तरुणीवर दोन्ही तरुणांनी बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित तरुणीने बदलापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पोलिसांनी भूमिकासह साताऱ्याहून आलेले तिचे मित्र शिवम राजे (२२) आणि संतोष रुपवते (४०) या तिघांना बेड्या ठोकल्या.
अटक केलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले, तेव्हा त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने ती गुंगीत असताना बलात्कार झाल्याचा दावा केल्यामुळे आता तिन्ही आरोपींची चौकशी करून या घटनेचा उलगडा करण्यात येत आहे.
Post a Comment