आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारी करिता मोठ्या पक्षाकडून सामाजिक कार्यकर्ते खेमराज भाऊ नेवारे यांना आली ऑफर....




गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 

वडसा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्र करिता वडसा येथील संयमी मनमिळाऊ गोरगरीब जनतेच्या कामाची तळमळ असणारे सर्वाचे सुपरीचीत सामाजिक कार्यकर्ते खेमराज भाऊ नेवारे यांना एका मोठ्या पक्षाकडून ऑफर आल्याची माहिती मिळाली आहे. खेमराज भाऊ नेवारे हे वडसा येथील



 सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तिमत्व असून आजपर्यंत त्यांनी शेतकरी , कष्टकरी ,कामगार वर्ग आदी लोकांच्या समस्यांना तोंड देऊन त्यांना न्याय सुद्धा मिळवून दिलेला आहे त्यांच्या सुखदुःखात सुद्धा सामील होऊन सर्वतोपरी कार्य केलेले आहे. यांना सध्याच्या घडीला जनतेने विधानसभा उमेदवारी करीता मोठ्या प्रमाणात भरघोस पाठिंबा दर्शविला आहे. काही जिल्ह्यातील संघटना काही संघाकडून सुद्धा खेमराज भाऊ यांना पाठिंबा मिळाला आहे . सध्याच्या घडीला पावसाचे दिवस सुरू असल्याने जिकडे तिकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना अशातच खेमराज भाऊ यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांना




 त्यांच्या शेतीच्या कामांमध्ये स्वतः मदत सुद्धा केलेली आहे .त्यांच्या या तळमळीच्या कार्यावरून खेमराज भाऊ नेवारे यांची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसून येत आहे. आणि या कार्यामुळेच त्यांना एका मोठ्या पक्षाच्या नेत्याने खेमराज भाऊंना ऑफर दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे . खेमराज भाऊ नेवारे यांच्या उमेदवारीने भल्या भल्याना
चांगला घाम फुटणार हे मात्र निश्चित मानले जात असल्याचे बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments