एटापल्ली :
एटापल्ली पासून
४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोत्ताकोंडा येथील युवक संजय देवू कोवासी (३०) हा युवक मागील ३ दिवसापासुन बेपत्ता होता. मात्र काल १ ऑगस्ट रोजी त्याचे प्रेत गावातील तलावात तरंगतांना आढळून आले. तो बेपत्ता असल्याची तक्रार कसनसुर पोलीस ठाण्यात मृतकाची पत्नी विमल संजय कोवासी हीने केली होती. मात्र काल दिनांक १ ऑगस्ट रोजी त्याचे प्रेत गावातीलच तलावात तरंगताना गावकऱ्यांना आढळून आले. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे आणले. पुढील तपास एटापल्ली
पोलीस करीत आहेत.
Post a Comment