गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गोंदिया
शहर प्रतिनिधी
अपघातग्रस्त तरुणीला लाडे यांनी वेळीच केले रुग्णालयात दाखल
बोंडगावदेवी : ट्रकच्या धडकेत गंभीर झालेल्या तरुणीला डॉ. भारत लाडे यांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास गोंदिया - कोहमारा मार्गावर घडली. स्नेहा पारधी (रा. गणखैरा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
डॉ. भारत लाडे हे मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाववरून त्यांच्या वाहनाने गोंदियाकडे येत होते. दरम्यान, कारंजाजवळ एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. डॉ. लाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला वेळीच स्वतःच्या वाहनाने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तरुणीचे प्राण वाचले.
तरुणीचे वडील उमेश पारधी यांनी
डॉ. लाडे यांचे आभार मानले. विशेष म्हणजे याच मार्गावरून एक पोलिस वाहन व रुग्णवाहिका गेली. पण, त्यांनी त्या अपघातग्रस्त तरुणीला मदत करने
टाळले. रस्त्यात कुणाचा अपघात झाल्यास जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन लाडे यांनी केले आहे.
Post a Comment