वीज पडून मृत्यू पावलेल्या कुटुंबीयाचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी केले सांत्वन ....

 - मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली - दि . ६जुन
सायंकाळच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असता यादरम्यान वीज कोसळल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील गुरुदास गेडाम रा गोवर्धन कुनघाडा रै व वैभव चौधरी रा शंकरपुर हेटी यांचा वज्रघाताने मृत्यू झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी चामोर्शी नगर पंचायतचे नगरसेवक आशिष पिपरे, विठ्ठल दूधबळे, अरुण किरमे, पत्रकार पुंडलिक भांडेकर, पंकज खोबे, मृताचे वडील मनिराम गेडाम, दिवाकर खोबे , संजय गेडाम आदी उपस्थित होते


मृत गुरुदास गेडाम हे नाव तयार करून तसेच मच्छी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. वीज पडून अकस्मात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर अवकळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असून, एक मुलगा मानसिक विकलांग आहे. माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.


0/Post a Comment/Comments