नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात दोन जवान शहीदगडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा
 छत्तीगडमध्ये लष्कर, निमिलष्कर
दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे सीआरपीएफच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात वाहनचालक आणि त्याचा सहकारी असे दोन जवान शहीद झाले आहेत. लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रकला उडवण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणला. जगरगुंडा भागातील कॅम्प सिल्गर येथून २०१ कोब्रा कॉर्म्सची तुकडी टेकलगुडेम येथे जात होती. या ताफ्यात ट्रक आणि मोटारसायकलींचा समावेश होता. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. आज, रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास या मार्गावर ट्रक जाताच आयईडीचा स्फोट झाला आणि वाहनचालक आणि त्याचा सहकारी शहीद झाले. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत. या स्फोटात काही सैनिक जखमी आहेत. नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी या परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments