एकाच कुटुंबातील सहा जण ठार तीन कुटुंबे उध्वस्त नातीचा वाढदिवस करून परततांना कार कोसळली कालव्यात.....
गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्त
मिळालेल्या माहितीनुसार

तासगावः नातीचा वाढदिवस करून घरी येत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रिकाम्या कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. तासगावमध्ये येथे ही घडली. मध्यरात्री रिकाम्या कालव्यात कार कोसळल्यानंतर वेळेत मदत न मिळाल्याने जखमींचा मृत्यू झाला आहे.

सांगलीमधील तासगाव- मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात एकमेव बचावलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तासगावः रिकाम्या कालव्यात कार कोसळून सहा जण ठार झाले.या अपघातात राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५६), पत्नी सुजाता (वय ५२, रा. तासगाव) मुलगी प्रियांका अवधूत खराडे (वय ३३), नात दुर्वा अवधूत खराडे

अखेरचा वाढदिवस

राजेंद्र पाटील सहकुटुंब नात राजवीच्या वाढदिवसासाठी पत्नी मुलगी आणि नातींसह गेले होते. त्यांनी आनंदाने नात राजवीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस पार पडल्यानंतर आजोबांसोबत आजोळी जात असतानाच काळाने कुटुंबावरच घाला घातला. त्यामुळे काही क्षणांमध्ये कुटुंबच उद्ध्वस्त झाले.

यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी आहे. अपघातग्रस्त अल्टो कार राजेंद्र पाटील चालवत होते.

(वय ५), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे (वय एक, सर्व रा. बुधगाव) आणि राजवी विकास भोसले (वय २ रा. कोकळे) यांचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र पाटील

मृत कुटुंबातील बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांची मुलगी राजवीचा वाढदिवस होता.

त्यासाठी सर्व कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वप्नाली यांच्या सासरी कोकळे गावी गेले होते. मंगळवारी रात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर जेवण करून तासगावकडे येण्यासाठी रात्री निघाले असता
हा अपघात झाला .

0/Post a Comment/Comments