सावली येथील नवरदेवाच्या आईच्या अपघाती मृत्यू, कारगिल चौकाजवळ झाला अपघात...

.

गडचिरोली
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली- सावलीचा नवरदेवाची . वरात धानोरा तालुक्यात लग्न समारंभ आटपून नवरदेवाची आई गावाकडे जात असतांना कारगिल चौकाजवळ अपघात घडला. यात नवरदेवाच्या आई व पुतण्याच्या गाडीला पिकअप ने धडक दिल्याने दोघेही जागीच कोसळले व रुग्णालयात नेत असताना नवरदेवाच्या आई मरण पावली. त्यामुळे सावलीत शोककळा पसरली.दि. 3 मार्च ला नगर पंचायत सावली चा कर्मचारी अविनाश

राऊत यांचा विवाह सोहळा धानोरा तालुक्यातील निमगाव (रांगी ) येथे 3 वाजता पार पडला. जेवण वैगेरे आटपून नवरदेवाची आई रेखा हि आपल्या सुनेचे स्वागत सावलीत होणार तेव्हा कामे आटपण्यासाठी ती आपल्या पुतण्याच्या गाडीत बसुन सावलीकडे जात असताना गडचिरोली कारगिर चौकाजवळ रस्त्याच्या कडेला पिकअप गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे रेखा खाली पडली . तिला सामान्य रुग्णायल गडचिरोली येथे भरती केले असता डॉक्टरांनी तिला मृत्यु घोषीत केले . तिचा मुलगा (नवरदेव ) रुग्णालयात धाव घेतली व आईचा हकीगत बघता त्यांनी हंबरडा फोडला तर सावली गावात शोककळा पसरली एक दिवशा पुर्वीच तिच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले होते.

0/Post a Comment/Comments