शेतामध्ये शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने केला बलात्कार
दिनेश रामाजी बनकर
 मुख्य संपादक
 गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा 

आरमोरी - एका नराधमाने शौचास गेलेल्या पीडित महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे दिनांक ०१ एप्रिल २०२४ ला दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास घडली. नवनाथ उर्फ नरेंद्र वामन दाणे वय वर्षे (२९) रा. इंजेवारी ता. आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार इंजेवारी येथील एका प्रतिष्ठित शेतकऱ्याच्या शेतात पीडित महिला ही चार पाच महिलांसोबत धानातील निंदा काढण्यासाठी मजूर म्हणून गेली होती. दरम्यान पीडिता ही शेतात

काम करीत असताना तिला संडास लागल्याने ती काम टाकून दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात संडासला जाऊन परत निघाली असता आरोपी नवनाथ दाणे याने पीडिता ही एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करून फरार झाला. यानंतर महिलेने आरडाओरडा करताच इतर काम करणाऱ्या महिला घटनास्थळी धावून येताच घडलेला प्रकार पीडितेने त्या महिलांजवळ कथन केला. यानंतर सदर पीडितेने आरमोरी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या बयाणावरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भां. द. वी. कलम ३७६ (१) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

0/Post a Comment/Comments