प्रखर उष्णतेच्या लाहित काँग्रेसची प्रचार रॅली सांगता झाली चामोर्शित प्रचाराची यशस्वी धुरा सांभाळत विजय वड्डेटीवार यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता पंजाला मतदान करण्याचे केले मतदाराला आव्हाहन लोकशाही वाचविण्यासाठी कमळाला धडा शिकवून पंजाला विकासाच्या कामाला लावा विजय भाऊ वडेट्टीवार....



दिनेश बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
चामोर्शी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली चामोर्शी शहरात झाली.



या रॅलीचे नेतृत्व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर प्रमुख उपस्थिती म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राह्मणवाडे, आरपीआय नेते ॲड. राम मेश्राम, रोहिदासजी राऊत, रा. कॉ. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार , काँग्रेस अनु.जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे तथा काँग्रेसचे वैभव भिवापुरे, नितिन वायलालवार, विनोद खोबे, हरबाजी मोरे, चारूदत्त पोहाणे, युवक काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, युवक काँग्रेस महिला आघाडी काँग्रेस इंडिया अलायन्स व तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते ,पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने रॅली सहभागी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.



प्रचाराच्या अंतिम दिवशी चामोर्शीत रॅली नंतर सांगता सभा पार पडली. सांगता सभेत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी गेली दहा वर्ष तुमचा खासदार तुम्हाला भेटला का, तुमच्या समस्या सोडवल्या का असा सवाल केला.त्यामुळे यावेळी परिवर्तन करावेच लागेल, असे सांगत गडचिरोली चिमूर मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबध्द आहे असा विश्वास मतदारांना दिला.



सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रचार संपत आहे आता जबाबदारी मतदारांची आहे. देशातील सत्ताधारी भाजपचे जुमलेबाज सरकार हे गेले दहा वर्ष तुमच्याशी खोटे बोलले, नुसती आश्वासन दिली.यावेळी मात्र कमळाला धडा शिकवला पाहिजे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे जनतेच्या समस्या सोडवण्यात सपेशल अपयशी ठरले आहे. आज काही वाटप होईल, पुन्हा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे जनतेने सावध राहील पाहिजे..आता पुन्हा तीच चूक केली तर अजून पाच वर्ष वाया जातील त्यामुळे यावेळी पंजाला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.


0/Post a Comment/Comments