महा अनिस ने अशी ,किमया केली - भुताची भीती मनातून पळूनच गेली.....गडचिरोली
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
काटोल :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा नागपूर द्वारे जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण देतांना पोस्टर्स वर चित्रित बुवाबाजी व तांत्रिक मांत्रीकांची भयानकतेची माहिती ऐकून मनातुन क्षुब्ध झालेल्या आंगनवाडी सेविकांना जेव्हा प्रत्यक्षात चमत्कार सादरीकरण करुन त्यामागील खरे वैज्ञानिक कारण सांगितले असता त्यांच्या मनातील भीती गायबच झाली.


जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर द्वारे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील प्रत्येक प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती काटोल च्या सभागृहांत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गट विकास अधिकारी गुंजनकर सर (बि डिओ) यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी ताई अशोक सयाम, महाअंनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे,जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, उत्तर नागपूर शाखेचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर मेश्राम, महिला विंग च्या प्रमुख प्रिया गजभिये मंचावर उपस्थित होते. पं स काटोल प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका भारती बोबडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व आरंभिक कार्यक्रमाचे संचालन पण केले .भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेचे वाचन चंद्रशेखर मेश्राम यांनी करुन महाअंनिस चे कार्यक्रमाला शुरुवात केली.
चित्तरंजन चौरे यांनी जादुटोणा विरोधी कायदा,त्यांची कलमे व शिक्षेचे प्रावधान ई बाबींचे प्रशिक्षण प्रत्येक चित्र पोस्टर च्या आधारे केले.


त्यानंतर प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण रामभाऊ डोंगरे व देवानंद बडगे यांनी पाण्याचा दिवा पेटवून दाखवताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.त्यानंतर, पैशाचा पाऊस पाडणे, जळती उदबत्ती आपोआप फिरवुन भुताचा शोध घेणे, मंत्रोच्चाराने हवण पेटविणे, बंद लोखंडी लंगर चमत्काराने उघडणे, ई.प्रयोग सादर करुन आंगनवाडी सेविकांची मने जिंकली.दरम्यान वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत गेलं व महिलांनी आपले डोके चालवणे शुरु केलं . तरीही हे चमत्कार कसे घडले त्याची कारणमीमांसा व वैज्ञानिक कारण शेवटी रामभाऊ डोंगरे यांनी सर्वांना अवगत केले. अंगणवाडी सेविकांनी सदर चमत्कार आपापल्या कार्यक्षेत्रात करणेचा निर्धार केला."हिच अमुची प्रार्थना" या मानवी मुल्य सांगणारे गीत देवानंद बडगे यांनी प्रस्तुत केले व कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन चित्तरंजन चौरे यांनी तर अंगणवाडी सेविका दिशा राऊत हिने आभार मानले.


0/Post a Comment/Comments